Dhananjay Munde Letter: राजकारणासह क्रिकेटच्या मैदानात शरद पवार (Sharad Pawar) यांचं बरचं वचर्स्व निर्माण केलंय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये (MCA) शरद पवारांनी आजही जम बसवलाय. सध्या सुरू असलेल्या एमपीएलच्या स्पर्धेच्या उद्घाटनाला माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडे खास मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांचे क्रिकेट विश्वात मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (गहुंजे) आंतरराष्ट्रीय मैदानास शरद पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याकडे केली आहे.


आणखी वाचा - MPL मध्ये Ruturaj Gaikwad चा धुमधडाका; 230 च्या स्टाईक रेटने बॉलर्सला आस्मान दाखवलं; पाहा Video


धनंजय मुंडे यांनी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांना पत्र लिहिलं. त्यांनी पत्रात नेमकं काय लिहिलंय पाहूया...


प्रिय रोहित दादा,


क्रिकेट हा आपल्या भारतीयांचा श्वास आहे, क्रिकेटचा सामना सुरू असताना प्रत्येक क्षणाला भरलेला उत्साह भारतीयांच्या नसानसातून वाहतो, हे आपण जाणतो. याच क्रिकेट विश्वात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजन केलं आणि महाराष्ट्रातील खेळाडूंना उच्चस्तरावर संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपलं मनस्वी अभिनंदन.


भारतीय क्रिकेट विश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम पद्मविभूषण आदरणीय शरद पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय ते अगदी आयसीसीच्या अध्यक्षपदावर आदरणीय साहेबांनी काम केलंय. भारताच्या महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा आणि संधी मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या क्रिकेटपटूना निवृत्ती नंतर पेन्दान मिळवून देणे याप्रकारच्या अनेक सोयी-सुविधा व संधी आदरणीय क्रिकेटर्सला मिळवून दिल्या. क्रीडा विश्वातील खो खो, कबड्डी सारख्या मातीतील खेळांना आंतरराष्ट्रीय दर्जा शरद पवार यांच्यामुळेच मिळाला. क्रिकेट व क्रीडा विश्वातील योगदान सांगायचे म्हटल्यास एक संपूर्ण पुस्तक लिहून तयार होईल, इतकं आहे, हे आपणही जाणता!


शरद पवार यांच्या या कार्याचा अभिमान आपल्या सर्वांनाच आहे. याच कार्याचा सन्मान म्हणून पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास पद्मविभूषण, आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव देण्यात यावं, अशी विनंती मी आपणास करत आहे. 


कळावं, धन्यवाद!