धनंजय मुंडेचा विरोधकांना धडकी भरवणारा `नवा लूक`
संयुक्त महाआघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची परळी येथे जाहीर सभा होती.
मुंबई : संयुक्त महाआघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची परळी येथे जाहीर सभा होती. तेव्हा धनंजय मुंडेचा नवा हेअर लूक पाहायला मिळाला. एरवी धनंजय मुंडे यांचे डोक्याचे केस नेहमी साध्या पद्धतीने दिसतात. मात्र, प्रचारसभेत मुंडेचा नवीन 'व्हिलन लूक' पाहायला मिळाला.
अर्थात प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्यांसाठी हिरो आणि विरोधकांसाठी निश्चितच व्हिलन असतो. पण आपण येथे फक्त धनंजय मुंडे यांच्या बदलेल्या लूक बद्दल बोलत आहोत. धनंजय मुंडे यांनी अचानक असा लूक का केला, याविषयी नेटीझन्समध्ये चर्चा होती.
निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. वेगवेगळ्या मुद्यांवर भाषण करत आहेत. वेगवेगळ्या मु्द्यांवर जनतेला संबोधित करत आहेत. त्यातचं धनंजय मुंडेनी हा नवा लूक म्हणजेच व्हिलन टाईप लूक जनतेला दाखवण्यासाठी केला? की विरोधकांना धडकी भरावी म्हणून केला? असा प्रश्न मुंडे समर्थकांना पडला आहे.
बीडच्या प्रचारसभेत धनंजय मुंडेनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आपल्या बहिणी पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांच्यावर देखील टीकेची तोफ डागली. मुंडे म्हणाले, गावागावात आमच्या दोन्ही बहिणी गेल्या. दोन्ही बहिणींनी बीड जिल्ह्याचा विकास काय केला, गावाचा विकास काय केला यावर भाष्य केलं नाही.
आपल्या परळी मतदारसंघात अनेक ठिकाणी यांनी सभा घेतल्या. सभेत म्हणाल्या कोण कुठल्या जातीचं आलं आहे जरा उठा, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांच्यावर निशाणा साधला.