धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा भाजप महिला मोर्चा आंदोलन करणार - पाटील
रेणू शर्मा (Renu Sharma) आणि करुणा शर्मा ( Karuna Sharma) प्रकरणावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चंदकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
पुणे : रेणू शर्मा (Renu Sharma) आणि करुणा शर्मा ( Karuna Sharma) प्रकरणावरून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, रुणा शर्मा यांच्या विषयात धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) राजीनामा दिला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी मांडलेली भूमिका भ्रमनिरास करणारी असल्याचा आरोपही, चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केला. रेणू शर्मा यांच्या विषयात चौकशी होईल, पण करुणा शर्मा यांच्या विषयात धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. मात्र मुंडे यांनी राजीनामा नाही दिला तर भाजप महिला मोर्चा आंदोलन करणार असल्याचा इशार।ही त्यांनी दिला.
चौकशीचे पोलिसांना आदेश
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार आरोपांबाबतचा तपास आठवड्याच्या कालावधीत पूर्ण करा असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिलेत. एसीपी ज्योत्स्ना रासम यांनी या संदर्भात तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढण्यात येणार नाही, असे राष्ट्रवादीने याआधीच स्पष्ट केले आहे.