सांगली : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता धनगर समाज आक्रमक झालाय. सांगलीत समाजाचे दोन मेळावे झालेत. या मेळाव्यात गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. त्यामुळे धनगर समाजाला अधिक बळ मिळणार आहे. राज्य सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अजून पूर्ण न झाल्याने धनगर समाज आक्रमक झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. जनता चुकीचे निर्णय घेते म्हणून गाढव निवडून येत असल्याचा जोरदार हल्ला त्यांनी चढवला. आरक्षणाची मागणी पूर्ण न केल्यास भाजप सरकार उलथून लावण्याचं आवाहन त्यांनी धनगर समाजाला केलं. सांगलीतल्या आरेवाडीच्या बनात धनगर मेळावा आयोजित करण्यात आला होता. 


धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं.  या मेळाव्यासाठी धनगर बांधव हजारोंच्या संख्येनं आरेवाडीच्या बनात दाखल झाले होते.  तर दुसरीकडे  आरेवाडीतच  राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली दुसरा मेळावा आयोजित करण्यात होता.