धनगर आरक्षणाचे आंदोलन पेटले; जालन्यात तुफान राडा,भाजप आमदाराला हाकलून लावलं
धनगर आरक्षणाचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आक्रमक आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली आहे.
Dhangar Reservation : जालन्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन पेटले आहे. धनगर आरक्षणाला हिंसक वळण लागले आहे. जालन्यात तुफान राडा पहायाला मिळत आहे. धनगर आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राडा,अधिकारी निवेदन घेण्यासाठी खाली येत नसल्याने आंदोलन कर्त्यांनी राडा घातला आहे.
दरम्यान, जालन्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन पेटले असतानाच दुसरीकडे भाजपचे जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना मराठा समाज बांधवांनी गावातून हाकलून लावलंय.अंबड तालुक्यातील शिराढोण गावात ही घटना घडली आहे.शिराढोण गावात कुचे आज गावातील विविध विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमासाठी गेले होते.यावेळी गावकऱ्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत कुचे यांना उदघाटन कार्यक्रमनानंतर हाकलून लावलं.शिराढोण गावात मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.