धुळे : जमिनीच्या मोबदल्यासाठी सरकारच्या लालफितीशी लढा देणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्यावर त्यांच्या धुळे जिल्ह्यातील विखरण गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८४ वर्षांचे शेतकरी असणाऱ्या धर्मा पाटील यांनी आपल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयामध्ये विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मुंबईतील जेजे  रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी त्यांचे निधन झाले.  


त्यानंतर जमिनीचा योग्य मोबदला देण्याचे आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देत नाहीत तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्विकारणार नसल्याची भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली. 


पण लेखी आश्वासन मिळाल्यावर नरेंद्र पाटील यांनी धर्मा पाटीलाचा मृतदेह ताब्यात घेतला. आज सकाळी विखरणमध्ये धर्मा पाटील अनंतता विलीन झाले