धुळे : धर्मा पाटील यांच्या मुलाने गंभीर आरोप करत, ज्या दिवशी धर्मा बाबा यांचा मृत्यू झाला त्या दिवशी रात्री आम्ही रूग्णालयात असतो तर परत येऊ शकलो नसतो, असा संशय नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. 


‘दिल्लीत आत्महत्या करू’


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी खासदार नाना पाटोळे यांनी  विखरणला भेट दिली त्यावेळी पाटील यांनी संशय व्यक्त करत सरकारने दिलेले लेखी आश्वासन पुर्ण केले नाही तर आपण स्वतः दिल्लीला आत्महत्या करू असा इशाराही नरेंद्र यांनी दिला आहे. 


मुंबईत आमच्यावर दबाव


आमच्या मुंबईत असताना दबाव आणला जात होता मात्र हा दबाव कोण आणत होते, हे सांगता येत नसल्याचे स्पष्ट करत नरेंद्र यांनी संशयाचे वातावरण निर्माण केले आहे.


मंत्रालयातही न्याय मिळाला नाही


धर्मा पाटील यांच्या बांधाला लागून असणाऱ्या शेतकऱ्यांना कित्येक पटींनी जास्तीचा मोबदला जमीनीचा मिळाला, पण त्यांना मंत्रालयाचा खेटा मारूनही मोबदला मिळाला नाही. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरणचे शेतकरी होते.


बाबुगिरीमुळे धर्मा पाटलांना न्याय नाही


मात्र ज्या शेतकऱ्यांनी दलालांमार्फत प्रकरण दिली, त्यांना चांगला मोबदला मिळाला, धर्मा पाटील यांनी नियमाप्रमाणे मोबदला मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या फेऱ्या मारल्या, शेतकरी धर्मा पाटील यांचा मंत्रालयातील फोटो देखील इंटरनेटवर सर्वत्र दिसून येत आहे.