मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : निसर्गातील चमत्कार वेगवेगळ्या गोष्टीतून समोर येत असतो. असाच एक चमत्कार उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील तेरखेडा बावी गावातील एका शेतकऱ्याचे बोकड चक्क दुध देवु लागल आहे. हे जरी ऐकायला आश्चर्य वाटत असलं तरीही हे सत्य आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाबी गावच्या धनंजय जगताप यांचा हा धर्मेंद्र बोकड आहे. या बोकडाचं नाव धर्मेंद्र असलं तरी हा बोकड चक्क दूध देतोय. जगताप यांच्या घरी वीस पंचवीस शेळ्या आहेत. त्यातला हा धर्मेंद्र चार दिवसांपासून दूध द्यायला लागल्याचं जगताप कुटुंबीयांच्या लक्षात आलं. त्यांच्या मुलाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्याने ही गोष्ट कुटुंबियांच्या निदर्शनास आणून दिलं. 


या बोकडाचं दूध काढलं नाही तर त्याला आपोआप पान्हा फुटतो. इतर बकऱ्यांची करडंही या बोकडाचं दूध पितात. दूध देणारा बोकड पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या लोकांनी गर्दी केलीय. बोकड दूध देतोय पाहून लोकं तोंडात बोटं घालतायत.



हार्मोन्सच्या इनबॅलेन्समुळे बोकडला पान्हा फुटला असावा असं पशूवैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा घटना लाखातून एक होतात. बोकडाचं दूध देणंही त्यापैकीच एक घटना आहे. पण वाबी गावातल्या शेतकऱ्यांसाठी हे चमत्कारापेक्षा काही कमी नाही. पशूवैद्यकीय तज्ञ या बोकडाची पुढील तपासणी करणार आहेत. पण निसर्गाचा हा चमत्कार सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. 


याआधी नवल जिल्ह्यातील राजुरा शहरात देखील असाच प्रकार घडला आहे. बाप्या नावाचा बकरा दूध देत असल्याची माहिती समोर आली. बाप्या दीड कप दूध देत असल्याची माहिती त्यांच्या मालकांनीदिली आहे. या बोकडाच्याबाबतीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते प्राण्यांमध्ये काही अवयव विकसित न झाल्याने अशी घटना घडली.