ब्रेक फेल झाल्याने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला अन्... धुळे भीषण अपघात 12 जणांचा जागीच मृत्यू
Dhule Accident : महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर हा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेला कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसल्याने मोठा अपघात घडलाय. या ्अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
Dhule Accident News : राज्यात अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच धुळ्यात (Dhule News) मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) एक भीषण अपघात झाला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पळासनेर गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने एक कंटेनर हॉटेलमध्ये शिरला. यामध्ये पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर पंधरा ते वीस जण जखमी गंभीर जखमी झाले आहे. अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. घटनास्थळी पोलीस (Dhule Police) दाखल झाले असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या जवळ असलेल्या भागात मोठा उतार आहे. त्या उतारावून मध्य प्रदेशाकडून महाराष्ट्राकडे येत असताना येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाले. त्यानंतर ब्रेक फेल झालेला कंटेनर थेट पळासनेर गावाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर मोठ्या संख्येने जमाव जमला आहे. तसेच पोलीस घटनास्थळी पोहोचताच तिथे मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. मात्र सीमावर्ती भागात अपघात झाल्याने मदत पोहोचवण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कसा झाला अपघात?
या अपघातामध्ये जवळपास बारा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि तो कंटेनर एका हॉटेलमध्ये जाऊन धडकला. या तसेच त्याने अनेक वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर तो हॉटेलमध्ये पलटला. या कंटेनरमध्ये असलेले सर्व साहित्य हे तिथे हॉटेलमध्ये असलेल्या लोकांच्या अंगावर पडलं. त्यात चिरडून आणि त्या अवजड साहित्यामध्ये दबून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अद्याप मयतांचा आणि जखमींचा स्पष्ट आकडा समोर आलेला नाही.
दरम्यान, या अपघातात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने अनेक वाहनांना देखील चिरडलं आहे. त्यामुळे काही जणांचा गाडीत दबूनच मृत्यू झाला आहे.
ट्रकने चिरडल्याने दोन महिलांचा मृत्यू
दोन दिवसांपूर्वी धुळ्यात एक विचित्र अपघात झाला होता. या भीषण अपघातात दोन महिलांना जीव गमवावा लागला. तर एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. रस्त्यावरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने चिरडल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.