प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे :  जिल्ह्यात एका अल्पवयीन विद्यार्थ्याने (Student) मित्राच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा हजार रुपयांच्या व्याजाच्या मोबदल्यात तब्बल एक लाख 60 हजार रुपयांची रक्कम वसुलीसाठी त्या विद्यार्थ्याकडे तगादा लावला गेला होता. अखेर त्याने मानसिक तणावात आत्महत्या केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
धुळे जिल्ह्यातील (Dhule) शिरपूर शहरात राहणारा विश्वजीत राठोड या 17 वर्षांच्या विद्यार्थ्यांने आपल्या भाग्येश या मित्राकडून 15 हजार रुपये व्याजाने घेतले होते. या 15 हजारांच्या व्याजाच्या मोबदल्यात विश्वजितकडून तब्बल एक लाख 60 हजार रुपयांची रक्कम चक्रवाढ पद्धतीने व्याजासह मागितली जात होती.  व्याजाची रक्कम देण्यासाठी विश्वजीतने स्वतःच्या घरात चोरी केली. आईची आठ ग्रॅम सोन्याची अंगठी सोनाराला विकली आणि ते पैसे त्याने भाग्येश भावसारला दिले. 


मानसिक तणावाने विद्यार्थी खचला
इतकं दिल्यानंतरही भावसारची व्याजाची मोह काही सुटत नव्हती. भाग्येशने विश्वजीतकडे अतिरिक्त पैशाची मागणी सुरूच ठेवली. इतकंच नाही तर 26 जानेवारी रोजी भाग्येश भावसार आणि त्याचं कुटुंबीय विश्वजीतच्या घरी पोहोचलं. विश्वजीतच्या कुटुंबीयांशी त्यांनी भांडण केलं. विश्वजीतच्या कुटुंबियांनी त्यांची समजूत घातली, पण आम्हाला आमच्या व्याजाची रक्कम हवी, असा तगादा त्यांनी लावला आणि याच मानसिक तणावात विश्वजीतने तापी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली
 
एका अल्पवयीन विद्यार्थ्याला व्याजाच्या रकमेपोटी आपला जीव गमावा लागला. या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यामध्ये सावकारीची रक्कम मागणाऱ्या भाग्येश भावसार, शेखर भावसार आणि भाग्येशच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे व्याजाच्या लालसेने एका निष्पक विद्यार्थ्यांचा बळी घेतला आहे. तरुणांनी अशा व्याजाच्या रकमेच्या संदर्भात कुटुंबीयांशी खोटं बोलू नये तसेच हालचालीच्या जाळ्यात अडकवल्या तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा अस आवाहन पोलिसांनी केलं आहे.


सावकाराच्या जाचामुळे कोणीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलून नये यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. विश्वजीतचा जीव घेणाऱ्या तिघांना कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी मृत विश्वजीतच्या कुटुंबीयांची आहे.