धुळे : शिरपूर तालुक्यातल्या चांदपुरी गावाजवळ ट्रॅक्टर पलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी आहे. 


मृतांची नावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोपाळ आणि विशाल पाटील या तरूणांचा यात दुर्देवी मृत्यू झाला. गरिब कुटुंबातील मुलांचा अशा अपघाती मृत्यूमुळे हिंगोणी आणि शिंगावे गावात दिवसभर चुल पेटली नाही. 


संपुर्ण परिसरात हळहळ


संपुर्ण परिसरात या अपघाताविषयी हळहळ व्यक्त केली जात होती. या अपघातात एक तरूण जखमी असून त्याच्यावर शिरपूरमध्ये उपचार सुरु आाहेत. नेमका हा अपघात कशामुळे झाला याची उकल झालेली नाही.