धुळे : राज्यातल्या बऱ्याचशा आदिवासी पाड्यांचा अजून बराच विकास व्हायचाय.. पण आता या आदिवासी मुलांनी नवनव्या वाटा शोधायला सुरुवात केलीय. इथली मुलं आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घ्यायला सज्ज झालीयत. धुळ्यात अनवाणी धावणारी आदिवासी पोरं आता सिंगापूर गाजवणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ध्येय गाठायचंच अशी दमदार इच्छाशक्ती असलेले ही सगळी खेळाडू मुलं आहेत, धुळ्यातल्या शिरपूरमधल्या आदिवासी पाड्यातली. या सर्व मुलांनी अवघ्या 33 मिनिटांत 10 किलोमीटर मॅरेथॉन शर्यत पूर्ण केलीय. हे 73 मुले खेळाडू म्हणून पहिल्यांदाच मुंबईत झालेल्या आयडीबीआय हाफ मॅरेथॉनमध्ये धावली. या खेळाडूंनी पहिल्या वीसांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. आदिवासी खेळाडूंमधीली ही जिद्द पाहता शिरपूर एज्यूकेशन सोसायटीनं या विद्यार्थ्यांना थेट सिंगापूरच्या  स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथॉनमध्ये न्यायचं ठरवलंय.


महत्त्वाचं असं की, सिंगापूर मॅरेथॉनमध्ये धावण्याची तयारी या धावपटूंकडून करुन घेणं गरजेचं होतं. त्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही संस्था पुढे आली. त्यांच्याच शिरपूर एज्यूकेशन सोसायटीमार्फेत आदिवासी खेळाडूंसाठी विशेष प्रशिक्षण सुरु करण्यात आलंय.