मुस्लिम बांधवांची पुण्यात अनोखी इफ्तार पार्टी
गरीब शेतकऱ्यांना गाई आणि शेळ्या इफ्तार पार्टी निमिेत्त भेट देण्यात आल्या.
पुणे : मुस्लिम बांधवांनी वेगळी इफ्तार पार्टी पुण्यात साजरी केली. गरीब शेतकऱ्यांना गाई आणि शेळ्या इफ्तार पार्टी निमिेत्त भेट देण्यात आल्या.
रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गायी आणि शेळ्या भेट देण्याचा उपक्रम राबवला. गायी आणि शेळ्यांमुळे गरीब शेतकऱ्यांना जोड धंदा मिळेल. त्यामुळे शेतकरी आत्महत्याकडे वळणार नाही.
तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य वाढवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. हिदायत संस्था, आदर्श मित्र मंडळ आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या वतीने हा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.