मनमाड : ऑनलाइन अभ्यात येत असलेल्या अडचणींच्या विवंचनेतून बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मुंजवाड गावात समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रेवती संजय वच्छाव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थींचे नाव आहे. ती सटाणा महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थी आहे. घरची  परिस्थिती बेताचीच. घरात एकच मोबाईल आणि शिकणारी तीन भावंडे. त्यातच रेवतीचे बारावीचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष. ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल मिळत नसल्याने आपला अभ्यास अपूर्ण राहील, या भीतीपोटी तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. 


रेवतीचे आई-वडील दोघेही मजुरी करतात. त्यामुळे तीन पाल्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी ते मोबाईल पुरवू शकत नसल्याने रेवतीने विषारी औषध घेवून आपले जीवन संपवले. सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आहे. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली शासन आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे