नाकपूर : क्रिमी लेयर तसंच काही प्रमाणपत्रांचं नुतनीकरण करताना नागरिकांना होणार त्रास लक्षात घेता, या प्रमाणपत्रांचं डिजिटल लॉकर बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी नागपुरात ही माहिती दिली. क्रिमी लेयरसारख्या काही प्रमाणपत्रांचं ठराविक वर्षांनंतर नुतनीकरण करताना प्रत्येकवेळी कागदपत्रं सादर करावी लागतात. 


नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी प्रमाणपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा कागदपत्रं सादर करण्याच्या नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. या सोबतच बनावट प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांच्या डिजिटल सहीचा वापरही केला जाणार आहे.


दरम्यान, सेवा हक्क कायद्याविषयी नागरिकांत जनजागृती करण्याच्या हेतूनं, १५ ऑगस्टला राज्यभरात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचं स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितलं.