`सत्ता` नसताना आपसात `संघर्ष` नको? - वळसेपाटील
जळगाव जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : राष्ट्रवादीचे नेते तसंच जळगाव जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
सत्ता नसताना संघर्ष कशाला करतात, जेव्हा सत्ता येईल तेव्हा पाहू. आता आपापसांतील मतभेद मिटवा, असा सल्ला वळसे पाटील यांनी दिलाय. माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व्यासपीठावर होते. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी नेत्यांसह महिला तसंच युवा पदाधिकाऱ्यांचेही कान टोचले.
केंद्र तसंच राज्य सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळलेले नाहीत. शेती, उदयॊग, रोजगार अशा सगळ्याच क्षेत्रात राज्याची पीछेहाट झाली आहे.
तसेच यामुळं विकास वेडा झालाय, या विषयाची जनतेकडून सोशल मीडियावर खिल्ली उडवणं साहजिक असल्याचं मत, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी जळगावात व्यक्त केलंय.
तर सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे लोडशेडिंग सुरु असल्याची टीका माजी ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.