सिंधुदुर्गात आज दीपक केसरकर, नारायण राणे एकाच मंचावर
राज्यभरातले सुमारे दीड लाख शिक्षक आज सिंधुदुर्गात एकत्र आलेत. आजपासून सिंधुदुर्गात राजस्तरिय शिक्षक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात एक अनोखा योगायोग बघायला मिळणार आहे.
सिंधुदुर्ग : राज्यभरातले सुमारे दीड लाख शिक्षक आज सिंधुदुर्गात एकत्र आलेत. आजपासून सिंधुदुर्गात राजस्तरिय शिक्षक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात एक अनोखा योगायोग बघायला मिळणार आहे.
विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रृत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. तळकोकणात राणे-केसरकरांचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रृत आहे. राणेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी कधी लागणार याविषय़ी अजूनही संभ्रमाचं वातवरण आहे.
राणे-मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट
आता आज मुख्यमंत्री स्वतःच राणेंची पुन्हा एकदा भेट होतेय. आणखी एक योगायोग म्हणजे राणे-मुख्यमंत्र्यांची याआधीची भेट नागपुरात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शहरात झाली. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंच्या शहरात येत आहेत.