आताची मोठी बातमी! Disha Salian मृत्यू प्रकरणाची चौकशी SIT मार्फत केली जाणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
`ए फॉर आदित्य...` Disha Salian मृत्यूप्रकरणाचे विधानसभेत पडसाद, दिशा सालियन मृत्यूप्रकरणी फेरतपासाची सत्ताधा-यांची मागणी,
Maharashtra Winter Session 2022 : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे (Disha Salian Death Case) पडसाद आज विधानसभेत उमटले. शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी काल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) A U नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya-Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला होता.
विधानसभेत पडसाद
खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपानंतर आज विधानसभेत याचे पडसाद उमटले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogowale) आणि भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) केली. दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी केलीय.
आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केलीय. सुशांत सिंग, दिशा सालियान प्रकरण समोर येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतले जाते? असा सवाल उपस्थित करत दाल मे कुछ काला है असं राणे म्हणालेत. तर ए फॉर आदित्य म्हणत शेवाळेंच्या आरोपांना राणेंनी दुजोरा दिलाय. तसंच मुंबई पोलिसांनी दिशा सालियन केस रिओपन करावी अशी मागणी त्यांनी केलीय. नितेश राणेंपाठोपाठ बडनेराचे आमदार रवी राणाही आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केलीय. उद्या विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचं रवी राणांनी सांगितलं.
एसआयटीमार्फत चौकशी करणार
दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याप्रकरणात पोलीस तपास सुरु आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी पुरावे द्यावेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ये AU Au कौन है?
त्याआधी विधानभवतच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करत बॅनरबाजी आणि घोषणाबाजी केली. ये AU Au कौन है? असे बॅनर सत्ताधाऱ्यांकडून फडकवण्यात आले.
संजय राऊत यांची टीका
आदित्य ठाकरेंवर राहुल शेवाळेंनी केलेला आरोप हा हलकटपणा, नीचपणा आहे अशी पातळी सोडून टीका संजय राऊत यांनी केली. खासदार शेवाळे हे किरकोळ माणूस आहेत असं राऊत म्हणाले. भूखंड प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्यामुळे लक्ष विचलीत करण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचं राऊत म्हणाले. तर चेंबूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंविरोधात आंदोलन केलं. सुशांत सिंग प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव घेणाऱ्या राहुल शेवाळेंविरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत.