Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील... महाराष्ट्राची लावणी डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. कधी डान्स, तरी राडा यामुळे गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. आता मात्र, गौतमी पाटील तिच्या आडनावामुळे चर्चेत आली आहे. पाटील आडनाव लावू नये, अन्यथा कार्यकम होऊ देणार नाही असा इशारा  मराठा ठोक क्रांती मोर्चाने गौतमीला दिला होता.  तर, पाटील आडनाव वापरणारच असं म्हणत गौतमीने देखील प्रत्युत्तर दिले.  गौतमी पाटीलला मराठा भूषण पुरस्कार द्या अशी शिफारस जळगावातल्या पाटील सेवा संघाने केली आहे.


जळगाव पाटील सेवा संघाचा गौतमीला पाठिंबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा सेवा संघातर्फे गौतमी पाटीलला मराठा भूषण पुरस्कार द्यावा, अशी शिफारस जळगाव जिल्ह्यातल्या पाटील सेवा संघातर्फे करण्यात आली आहे. गौतमी पाटीलला जळगाव पाटील सेवा संघानं पाठिंबा दिला आहे. जळगावमध्ये कार्यक्रम झाला तर सेवा संघाचे सगळे लोक त्यांच्या कुटुंबीयांसह दाद द्यायला जाणार आहेत. एकीकडे पाटील आडनाव लावून गौतमी पाटलांची बदनामी करतेय. त्यामुळे तिनें पाटील आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा थेट इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक राजेंद्र जऱ्हाड-पाटील यांनी दिला होता. दुसरीकडे जळगावातल्या पाटील सेवा संघानं मात्र गौतमीला पाठिंबा दिला आहे. 


गौतमी पाटीला विरोध करणं चुकीचं


गौतमी पाटीलला पुण्यात विरोध होत आहे. तर, जळगावत मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. गौतमी पाटील यांना ज्यांनी विरोध केला आहे तो कोणत्या संघटनेचा आहे ? कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे?  त्याचं समाजासाठी कुठलं योगदान आहे ? असे सवाल उपस्थित करत गौतमी पाटीला विरोध करणं हे चुकीचं आहे असं म्हंटल आहे. 


सर्व समाजात पाटील आडनाव असतं


पाटील हे मराठा समाजाचं आडनाव नाही. या सर्व समाजात पाटील आडनाव असतं. त्यामुळे गौतमी पाटील नाव असल्याने बदनामी होते असे नाही. आजपर्यंत पाटील नावावरून कुठलंही वादंग उठले नाही स्मिताताई पाटील या अभिनेत्री होत्या यांच्या बाबतीतही असं घडलेलं नाही. गौतमी पाटील हिने पाटील आडनाव लावावे.  गौतमीला मराठा सेवा संघातर्फे मराठा भूषण पुरस्कार देण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे शिफारस करणार आहे. 


बाकीच्या आडनावावरून राजकारण का होत नाही?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मराठा पाटील आहेत. पाटील आडवा आणि पाटील जिरवा असा एकमेव कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे अशी घणाघाती टीका जळगाव समाजाने केली आहे.