सावधान...! एसटी महामंडळ `शिवशाही`च्या या कारणाचा अजून शोधंच घेतंय...!
शिवशाहीवर काही खासगी बस चालकांमुळे आणि त्यांना देत असलेल्या डबल-डबल ड्युटीमुळे अपघात होत आहेत.
औरंगाबाद : शिवशाहीवर काही खासगी बस चालकांमुळे आणि त्यांना देत असलेल्या डबल-डबल ड्युटीमुळे अपघात होत आहेत, हे जाहीर असतानाही, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, यांनी शिवशाही बसचे अपघात का होत आहेत, या बाबत एक समिती प्रकरणाची चौकशी करत असल्याचं म्हटलं आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्यासोबत चर्चा केली, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
सोबतच शिवशाहीच्या वाढत्या अपघाताबाबत त्यांना विचारणा केली असता, याबाबत एक समिती या प्रकऱणाची चौकशी करीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
अपघाताची कारणं शोधत असल्याची माहिती त्यांनी दिलीय, आणि एसटी महामंडळाच्या चालकांना यापुढं केंद्राच्या सीआरटीमध्ये प्रशिक्षण देणार असल्याचं दिवाकर रावते यांनी सांगितलं. मात्र या परिस्थितीत शिवशाहीचे चालक मात्र खाजगी आहे त्यांना आता एसटीमहामंडळ प्रशिक्षण देणार का असे सगळे प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित झाले आहेत.