रोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? Jay shah यांनी दिले स्पष्ट संकेत

Team India Next T20I Captain : वर्ल्ड कप विजेता कॅप्टन रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? असा सवाल विचारला जात असताना जय शहा (Jay Shah) यांनी मोठे संकेत दिलेत.

| Jul 01, 2024, 15:45 PM IST
1/7

रोहित शर्माची निवृत्ती

वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर आता रोहित शर्माने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता नव्या कॅप्टनचा शोध सुरू झालाय.

2/7

जय शहांचे संकेत

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी टीम इंडियाच्या नव्या टी-20 कर्णधाराबाबत मोठे संकेत दिले आहेत.

3/7

सिलेक्शन कमिटी

सिलेक्शन कमिटी कर्णधारपदाचा निर्णय घेतील. त्यांच्याशी बोलून आम्ही याबाबत आम्ही लवकरच जाहीर करू, असं जय शहा यांनी म्हटलं आहे.

4/7

पांड्याचा फॉर्म

पांड्याच्या फॉर्मवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, परंतु आम्ही आणि निवडकर्त्यांचा त्याच्यावर विश्वास होता, असंही जय शहा यांनी म्हटलं आहे.

5/7

पांड्याच कॅप्टन?

जय शहा यांनी हार्दिक पांड्याचा सिलेक्शनचा मुद्दा मांडल्याने आता आता पांड्याच कॅप्टन असेल, असा अंदाज लावला जात आहे. 

6/7

बुमराह की सूर्यकुमार ?

हार्दिक पांड्या व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत या खेळाडूंचं देखील नाव देखील चर्चेत आहे.

7/7

विराट कोहलीची निवृत्ती

दरम्यान, विराट कोहलीने देखील निवृत्ती जाहीर केल्याने त्याच्या जागी आता कोणाला संधी मिळणार? असा सवाल देखील विचारला जातोय.