दिवेआगर : रायगडमधल्य़ा बहुचर्चित दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा व खून खटल्यातल्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३ महिला आरोपींना दहा वर्षांची शिक्षा सुनावलीय. तर या प्रकरणातल्या २ सराफांना ९ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. रायगडचे विशेष मोका न्याशयाधीश किशोर पेटकर यांच्यान न्यारयालयात हा खटला सुरू होता.


२४ मार्च २०१२ रोजी रात्रीच्या सुमारास दिवेआगरच्या गणेश मंदिरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी तेथील सव्वा किलो वजनाची सोन्याची गणेशमूर्ती पळवून नेली. त्याचवेळी तिथं रखवालीसाठी असलेले महादेव घडशी आणि अनंत भगत या दोन ग्रामस्थांच्या डोक्यात प्रहार करून खून करण्यात आला होता.


संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलिसांनी मोठया शिताफीने तपास करून एकूण बारा आरोपींना ताब्यात घेतलं होतं. आरोपींकडून गणेशमूर्तीचे वितळवलेले १ किलो २४६ ग्रॅम ४३० मिलीग्रॅम सोनेदेखील हस्तकगत करण्यात आले होते.