Viral Video : `मला वेडी बोलली?`, भावाला ओवाळणाऱ्या चिमुकलीचा स्वॅग पाहिला का?
आतापर्यंत तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असेल आणि जर नसेल पाहिला तर, आताच पाहा कारण हा Viral Video इतका गोड आहे, की पाहताक्षणी तुम्ही तो status ला ठेवाल.
Diwali bhai dooj 2022 Viral Video : लहानपणापासूनच आपण एक गाणं ऐकत मोठे झालो. दिवाळीचा (Diwali 2022) सण आला, की हे गाणं हमखास कानांवर पडणार यात वादच नाही. तुम्हाला आतापर्यंत हे गाणं कोणतं याचा अंदाज आला असेलच. 'भाऊबीज' (Bhaubeej) या 1955 मधील चित्रपटातील हे गाणं. आशा भोसले यांनी स्वरबद्ध केलेलं हे गाणं आजही भाऊ- बहिणीच्या नात्याला सुरेखरित्या समोर आणतं. बहिणीचं भावावर असणारं प्रेम या गाण्यातून व्यक्त होत आहे. पण, सध्या मात्र एक बहीण या गाण्यातील 'वेडी' हा शब्दच धरून बसली आहे.
'मला वेडी बोलली...' असं म्हणत ही बहीण ओवाळणी करताना गाणं म्हणणाऱ्या व्यक्तीला प्रश्न करत आहे. आतापर्यंत तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असेल आणि जर नसेल पाहिला तर, आताच पाहा कारण हा Viral Video इतका गोड आहे, की पाहताक्षणी तुम्ही तो status ला ठेवाल.
अधिक वाचा : Indian Railways: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा आनंद गगनात मावेना
व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी तिच्या भावाला (Bhai dooj) ओवाळताना दिसत आहे. भाऊराया अतिशय शांतपणे बसलेला असताना ही लाडाची लेक मात्र भलतीच आनंदात दिसत आहे. आपण काहीतरी भन्नाट काम करत असल्याची भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळत आहे.
मोठ्या प्रेमानं ती भावाला ओवाळत असतान घरातील कुणी मोठं व्यक्ती तिथं 'सोनियाच्या ताटी' हे गाणं म्हणताना दिसत आहे. गाण्यातील 'वेड्या बहिणीची वेडी ही माया' ही ओळ म्हणताच ही चिमुकली ओवाळता ओवाळता थांबते आणि म्हणते 'मला वेडी बोलली?'. हा व्हिडीओ तिच्या या निरागस प्रश्नावरच थांबतो.
Video तिथेच संपला असला तरी पुढे जे झालं ते त्याहून कमाल आहे. कोणीतरी हे क्षण कॅमेरात कैद केले, कोणी ते शेअर केले आणि बघता बघता दर दुसऱ्या व्यक्तीनं हा व्हिडीओ सोशल मीडियावरील सर्वच अकाऊंट्सवर स्टेटसमध्ये ठेवला. इतकं निरागस राहता आलं पाहिजे, असं म्हणत बऱ्याचजणांनी लहानपण किती रमणीय असतं यावर भर दिला. तुम्ही लहानपणी असं काही केलंय का? कमेंटमध्ये कळवा....