दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी दिला संपाचा इशारा
ST Employees warned : एसटी महामंडळाच्या आर्थिक डबघाईचा फटका सहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी (ST Employees) आता संपाचा (Strike) इशारा दिलाय.
मुंबई : ST Employees warned : एसटी महामंडळाच्या आर्थिक डबघाईचा फटका सहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी (ST Employees) आता संपाचा (Strike) इशारा दिलाय. महामंडळाचा सरकारी सेवेत समावेश करा अशी मागणी कऱण्यात आलीय. 17 कामगार संघटनांच्या कृती समितीने संपाची हाक देत तारीख लवकरच जाहीर करण्याची माहिती दिली. (ST Employees warned of a strike)
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत 'समान काम समान दाम' या न्यायाने वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने विभागीय कार्यालयांवर निदर्शने केली. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला होता. त्यानुसार हा संप पुकारण्यात येणार आहे. तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती संघटनेने दिली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळामध्ये ऑक्टोबर 2019 पासून आज अखेर 12 टक्के महागाई भत्ता सुरू आहे. राज्य शासनाने मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वेळोवेळी वाढ केली आहे. तसेच त्यांना या महिन्यापासून 28 टक्के महागाई भत्ता लागू झाला आहे. एसटी महामंडळाने 12 टक्यानंतर आजपर्यंत महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मागणी केली आहे.
कोविड-19 मुळे कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेवर होत नाही. परिणामी कर्मचारी कर्जबाजारी झाल्याने आतापर्यंत सुमारे 25 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना उसनवारी घ्यावी लागते आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्काचा महागाई भत्त्याचा फरक आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन 1 नोव्हेंबर रोजीच दिवाळीपूर्वी करावे जेणे करून कर्मचाऱ्यांना सणासुदीची खरेदी करता येईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.