Thane Illegal School List : ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेने ही यादी जाहीर केली आहे (Thane Illegal School). या शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेवू नका असे अवाहन  ठाणे जिल्हा परिषदेने पालकांना केले आहे. या अनाधिकृत शाळांवर कारवाईता बडगा उगारण्यात आला आहे. यानंतर पालकांना देखील ठाणे जिल्हा परिषदेने सतर्क केले आहे. 


अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर ठाणे जिल्हा परिषद मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात 27 माध्यमिक शाळा अनधिकृत आहेत. यापैकी 10 अनधिकृत शाळा सुरू आहेत. 17 शाळांनी शाळा बंद करण्याबाबतचे हमीपत्र सादर केले आहे. पुढील शैक्षणिक वर्ष  2023 - 2024 करिता या अनधिकृत शाळेत मुलांना प्रवेश घेऊ नये असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.


ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी


  1. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई

  2. स्टार इंग्लिश हायस्कुल, ठाणे मनपा क्षेत्र

  3. डिवाईन ग्रेस हायस्कुल , वज्रेश्वरी ता.‍ भिवंडी

  4. बी.एस.एस इंग्लिश स्कूल ,गणेशनगर चितळसर, मानपाडा ठाणे

  5. श्रीम कावेरीताई पाटीलइंग्लिश मिडीअम स्कूल,कळवा ठाणे

  6. आर एन इंग्लिश स्कूल कोन गाव भिवंडी ठाणे

  7. फरान इंग्लिश मिडीअम स्कुल,गौरीपाडा, भिवंडी जि.ठाणे

  8. ओमकार इंटरनॅशनल स्कुल,चौळे, ता. कल्याण जि.ठाणे

  9. नारायणा ई-टेक्नो स्कूल,ढोकाळी गाव, ठाणे (प) ता. जि.ठाणे

  10. देविका इंग्लिश मिडीअम स्कूल,रेतीबंदर रोड, मौजे काल्हेर,ता. भिवंडी,जि.ठाणे

  11. सेंट पॉल इंग्लिश सेंकडरी हायस्कुल चिंचपाडा नवी मुंबई मनपा क्षेत्र

  12. श्री साई ज्योती सेकंडरी स्कुल, कोपरखैरणे, नवी मुंबई

  13. प्रगती विद्यामंदिर, अंबरनाथ

  14. युनिक इंग्लिश मिडीयम स्कुल, कल्याण

  15. होली मारीया कॉन्व्हेन्ट हायस्कुल, ठाणे मनपा क्षेत्र

  16. सिम्बॅायसिस कॉन्व्हेंट हायस्कुल ठाणे

  17. आतमन ॲकॅडमी ठाणे , ठाणे मनपा क्षेत्र

  18. अरुण ज्योत विदयालय ठाणे, ठाणे मनपा क्षेत्रॉ

  19. नॅशनल इंग्लिश स्कुल, दापोडे ता.भिवंडी

  20. नूर हायस्कूल ॲन्ड ज्यु. कॉलेज,नूर बाग अल्मास कॉलनी रोड कौसा मुंब्रा ठाणे

  21. श्रीम. भागीरथी वझे एज्युकेशन व वेल्फेअर ट्रस्ट,मानपाडा गाव डोंबिवली (पु) जि.ठाणे

  22. श्री. विद्या ज्योती स्कूल,डावले, ठाणे

  23. डायमेशन इंग्लिश स्कूल,सर्व्हे न 60/3 मौजे कौसा,मुंब्रा, जि.ठाणे

  24. आदर्श विद्यालय, लोढा हेवन कल्याण

  25. पारसिक स्पेशल स्कुल, मिरा भाईंदर ठाणे

  26. आरकॉम इग्लिश स्कुल, ठाणे

  27. नालंदा हिंदी विद्यालय ठाणे मनपा क्षेत्र


मुंबईतील 210 बेकायदा शाळांमधल्या तब्बल 60 हजार विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात


मुंबईतल्या अनधिकृत शाळांवर आता फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तेव्हा 210 बेकायदा शाळांमधल्या तब्बल 60 हजार विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय.. या विद्यार्थ्याचं समायोजन नजीकच्या पालिका किंवा मान्यताप्राप्त शाळांमध्ये करण्यात येणार आहे. मात्र पालकांनी शाळेची मान्यता तपासूनच प्रवेश घ्यावा असं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.