कुत्रा आडवा आला; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
महामार्गावर जंगली प्राणी येऊ नये, यासाठी दुतर्फा 15 फूट उंच संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तरीही येथे प्राण्यांचा मुक्त संचार पहायला मिळतो.
Accident On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघातांची मालिका सुरुच आहे. समृद्धी महामार्गावरील वाशिम येथे भीषण अपघात झाला. या अपघातात 13 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कार सोमर कुत्रा आडवा आल्याने हा अपघात झाल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे. या अपघाताचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
कारंजा तालुक्यातील पोहा हद्दीत हा अपघात घडला आहे. महाजन कुटूंब समृद्धी महामार्गाने नागपूरला जात होते. या दरम्यान कारच्या समोर कुत्रा आडवा आल्याने कारचा अपघात झाला. यावेळी कारने तीन-चार पलट्या खाऊन रोडच्या या साईडऊन त्या साईडला गेली. या अपघातात स्वरा महाजन (वय 13 वर्षे) ही गंभीर जखमी झाली आहे.
कारमधील कुटुंबातील इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन ते चार दिवस आधी मंगरूळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे परिसरात समृद्धी महामार्गावर गुरे फिरत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे .यामध्ये एक बैल चार चाकी गाडीला धडकताना दिसत आहे.
प्राणी महामार्गावर येवू नये म्हणून विशेष उपाययोजना
समृद्धी महामार्गावर प्राणी गुरे-ढोरे येऊ नये म्हणून, महामार्गाला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. मात्र संरक्षण भिंत अनेक ठिकाणी खुली असल्याने वन्य प्राणी, गुरे-ढोरे महामार्गावर येतात. यामुळे अपघातांचे सत्र वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून,यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
माकडाच्या पिल्लाने टेडी बियरमध्ये आई शोधली
वर्धामधल्या या हृदयद्रावक प्रसंगाने तुमचेही डोळे पाणावतील. अपघातात आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाने टेडी बियरमध्ये आई शोधली आहे. टेडी बियरच्या अंगाखांद्यावर खेळत हे पिल्लू तिचं दुधही पित. समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडताना या पिल्लाच्या आईला जीव गमवावा लागला. तेव्हा हे पंधरा दिवसाचं पिल्लू आईलाच बिलगून होतं. तेव्हा या पिल्लाला आई मिळवून देण्यासाठी प्राणीमित्रांनी ही टेडी बियरची शक्कल लढवली. हळुहळु या निर्जीव बाहुल्यातच या पिल्लाने आपली आई शोधली. टेडी बियरच्या शरीराला दुधाची बॉटल लावत दूध पाजण्याची सुरुवात झाली. आता हे पंधरा दिवसांचं पिल्लू दोन महिन्यांचं झालंय. मात्र टेडी बियरलाच आपली आई समजून ते त्याला बिलगून असतं.