Dombivli Fruit Seller:  सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. कधी कधी याच व्हायरल व्हिडिओवरुन बऱ्याच गोष्टी समोर येतात. तर, कधी एखाद्याच्या भांडाफोड होतो. अशाच एका व्हिडिओमुळं डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. डोंबिवलीतील हायप्रोफाइल लोढा हेवन परिसरात एक धक्कादायक प्रकार कित्येक दिवसांपासून सुरू होता. मात्र, सोशल मीडियामुळं हा प्रकार उघडकीस आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सध्या एका फळ विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यातमध्ये हा विक्रेता एका पिशवीमध्ये लघूशंका करुन ती त्याच हातगाडीवर ठेवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील लोढा पलावा येथील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. 


हा व्हिडिओ व्हायरल होताच बजरंग दलाच्या कार्यकर्ते यांनी  फळविक्रेत्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. डोंबिवलीतील हायप्रोफाईल लोढा हेवन परिसत बजरंग दल आणि स्थानिक नागरिक  फेरीवाल्यांच्या विरोधात संतप्त झाले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या फेरीवाल्याला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर  या परिसरातील नागरिक आणि  बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत लोढा परिसरात फेरीवाल्यांच्या गाडीची  तोडफोड करत आंदोलन केले होते. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिसरातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. 



दरम्यान, हा फळ विक्रेता प्लास्टिकच्या पिशवीत लघुशंका करुन त्याच घाणेरड्या पिशव्यातून फळे भरून ग्राहकांना देत होता, असा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हा किळसवणा प्रकार असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात होता. गेल्या एक महिन्यापासून असा किळसवाणा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 


दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा अनधिकृत फेरीवाले व ठेलेवाले यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी होत आहेत. तसंच, स्वच्छता न बाळगणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातही कठोर पावलं उचलण्यात येण्याची गरज आहे.