जावेद मुलाणी, झी मीडिया, जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत अर्थात खंडोबाच्या जेजुरीत गाढवांचा बाजार भरलाय. राज्य आणि परराज्यातून गाढव इथं विक्रीसाठी आलेत. या यात्रेत लाखोंची उलाढाल होते. पाहूया कशी असते ही यात्रा.. 


बारा बलुतेदारांची यात्रा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पौषपौर्णीमा आली की जेजुरीला वेध लागतात ते यात्रेचे.. बारा बलुतेदारांची ही यात्रा.. म्हणूनच या यात्रेत वैदू, बेलदार, गाडीवडार, मातीवडार, कैकाडी, मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले अशा भटक्या जमातीतले लोकं हमखास दिसतात.. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं भरणारा गाढवांचा बाजार...पूर्वापार भरत असलेल्या या बाजारात कोट्यवधीची उलाढाल चालते..एक हजारांच्यावर गाढवांची खरेदी विक्री इथं होते.. व्यवहारानंतर इथं आलेले व्यापारी खंडोबाचं दर्शन घेऊनच माघारी जातात.. 


दुस-या राज्यांमधून गाढव


गुजरात, राजस्थानमधूनसुद्धा इथं गाढवं विक्रीसाठी आणली जातात.. गावठी गाढवाची किंमत आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत असते.. तर काठेवाडी गाढवांना चाळीस हजार रुपयांपर्यंत भाव मिळातो.. दात, रंग पाहून गाढवाचे किंमत ठरते.. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे म्हटले जाते.


इथले व्यवहार वायदे बाजारातील व्यापा-यांना लाजवतील असे असतात.. त्यामुळेच जेजुरीचा गाढव बाजार पहाण्यासाठी लोकं गर्दी करतात...