कोल्हापूर : भाजप नेते किरिट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर दोन साखर कारखान्यांधमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते.पण कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना कराड इथं पोलिसांनी रोखलं. त्यामुळे या घडामोडींना नाट्यमय वळण मिळालं. सोमय्या यांना पोलिसांनी रोखल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर
जोरदार टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केली असून 28 सप्टेंबरला हा दौरा नियोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. किरीट सोमय्या यांना कोणी रोखू नये, मी सर्वांना हात जोडून विनंती करतो कोणी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं वर्तन करु नये, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तसंच ते काय करतात ते त्यांना करु द्या, जे विरोध करतील ते माझे कार्यकर्ते नाहीत, कार्यकर्त्यांना आवर घालण्याचं काम माझं असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.


सोमय्या यांनीही संयम बाळगावा


हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांनाही विनंती केली आहे. सोमय्या यांनी देखील कायदा-सुव्यवस्था निर्माण होईल असं वर्तन किंवा वक्तव्य करु नये, सोमय्या यांनी आल्यावर आमचं काम कसं आहे हे पाहावं, अशी विनंती मुश्रीफ यांनी केली आहे. तसंच गेल्या 5 वर्षात तुमचं सरकार होतं, त्यावेळी का चौकशी झाली नाही.
केंद्री यंत्रणेचा गैरवापर करण्याचं काम सुरु असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. मी सातत्याने आवाज उठवला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. कोणताही आरोप करायला हरकत नाही, पण जुनी प्रकरण काढून आरोप करणं चुकीचं असल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.


कारखान चालाव यासाठी स्वत:चा पैसा लावला


शेतकरी, कामगार आणि मजूरांचा हक्काचा कारखाना असावा यासाठी तेव्हा सहकारी कारखाना काढला.  या कारखान्यासाठी गैरमार्गाने पैसा मिळवल्याचा आरोप होत आहे, पण एका पैशाच्या गैरव्यवहाराचाही कारखान्याशी संबंध नाही, असा दावा मुश्रीफ यांनी केली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना बंद पडण्याचा मार्गावर होता. त्यावेळी ब्रिक्स इंडिया या माझ्या मित्राच्या कंपनीला कारखाना चालवाव अशी विनंती केली. ८ वर्षात कोटीच्यावर तोटा कंपनीला आला. एवढा तोटा सहन करुन शेतकऱ्यांना एफआरपी दिला आहे, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.