ठाणे : अँटोप हिलमधल्या दोस्ती पार्कच्या बिल्डरनं आणखी एक धोकादायक बांधकाम ठाण्यात केल्याचं उघड झालंय... महत्त्वाचं म्हणजे, २०१० मध्ये दोस्ती पार्कच्या बिल्डरनं केलेलं हे बांधकाम कोसळून ८ स्थानिक आणि कामगारांचा मृत्यू झाला होता... २०१० मध्ये वर्तकनगर परिसरात दोस्ती ग्रुपच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यासाठी संरक्षक भिंत बांधली जात होती. या भिंतीचं बांधकाम सुरू असताना भिंतीचा भाग कोसळला होता आणि ८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही दोस्ती ग्रुपचा एक ठेकेदार आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल झाला होता. आणि त्यांना अटकही करण्यात आली होती. गरोडिया बंधूंची दोस्ती ही बांधकाम कंपनी आहे. 


'दोस्ती' बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील वडाळा भागातील अॅन्टॉप हिल परिसरात 'लॉईड इस्टेट' इमारतीची संरक्षक भिंत कोसळली तसंच शेजारचा रस्ताही खचला. पहाटे ४.३० वाजल्याच्या सुमारास लॉइड इस्टेट, विद्यालांकर रोड, वडाळा पूर्व मुंबई या ठिकाणी ही घटना घडली. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या ठिकाणी यंत्र सामुग्रीच्या साहाय्याने मानवी जीवन धोक्यात येईल असे जाणीवपूर्वक बेदरकारपणे खोदकाम सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान २८७, ३३६, ४३१, ४२७ नुसार गुन्हा दाखल केलाय. यात सदर निष्काळजी बांधकामामुळे सार्वजनिक रस्त्यावर सुरक्षितता कमी होऊन 'लॉइड इस्टेट' इमारतीमधील रहिवासियांची वाहने मातीच्या ढिगाऱ्यात जाऊन नुकसान झाले, म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.


लॉईड इस्टेटमधील रहिवाशांनी दोस्ती कन्स्ट्रक्शनच्या या बांधकामाबाबत आक्षेप घेवून बीएमसीकडे तक्रार केली होती. इमारतीला धोका असल्याचे सांगूनही बीएमसीनं काहीच कारवाई केली नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.