दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरले
दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलंय. शिरुर तालुक्यातील शिरगाव काटा गावात खळबळजनक घटना घडलीये. एकाच ठिकाणी वृद्ध महिला आणि पुरुषाची निघृण हत्या झालीये.
पुणे : दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलंय. शिरुर तालुक्यातील शिरगाव काटा गावात खळबळजनक घटना घडलीये. एकाच ठिकाणी वृद्ध महिला आणि पुरुषाची निघृण हत्या झालीये.
वच्छलाबाई पोपट माने (वय-७०) आणि किसन सुलेमान लोंढे अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीये.
वयोवृद्ध व्यक्तींच्या हत्येमुळे शिरुर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी मध्यऱात्री ही घटना घडली. या घटनेत मारेकऱ्यांनी खून करुन घराला बाहेरून कुलूप लावले होते, त्यामुळे शेजाऱ्यांना समजले नाही.
घर दिवसभर घर बंद असल्याने दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.