अंबरनाथ : एका मद्यधुंद तरुणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हायरल होणारी व्हीडिओत ही तरुणी रस्त्याच्या मधोमध उभी राहून येणा जाणाऱ्या भरधाव गाड्यांची अडवणूक करतेय. हा सर्व प्रकार गोविंदतीर्थ पुलाजवळचा आहे. (Drunk girl insults drivers on Govindtirtha bridge in Ambernath)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गोविंदतीर्थ पुलावरुन मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये जा होत असते. याच पुलावरुन गाड्या वेगात ये जा करत असतात. ही नशेत असलेली तरुणी रसत्याच्या मधोमध उभी राहून गाड्यांची विनाकारण अडवणूक करत होती. ही तरुणी इतक्यावरच थांबली नाही. तिने पुढे या वाहनचालकांना अश्लील शिवीगाळही केली. दरम्यान या मुलीचा हा व्हीडिओ जोरदार व्हायरल होतोय.