सांगली : मद्यधुंद असवस्थेत एका तरूणाने भर दिवसा सांगलीत राडा केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली आहे. सांगलीमधील महाराजा चौक परिसरातील दहा चारचाकी गाड्या या तरूणाने फावड्याच्या सहाय्याने फोडल्या आहेत. मद्यधुंद युवकाने फावड्याच्या सहाय्याने ही तोडफोड केली. यामध्ये तरूणाने पाच ते सहा गाड्यांची तोडफोड केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


परिसरातील नागरिकांनी साहस करून तरूणाला फावड्यासह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. २७ वर्षीय मंद्यधुंद अवस्थेतील तरूणाचं अखिलेश महेश दरूरमठ असं त्या युवकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी अचानक मद्यधुंद अवस्थेत हा युवक कॉलेज कॉर्नर परिसरात आला. त्याच्या हातात फावडे होते. 



अचानक रस्त्याकडेला उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. कॉलेज कॉर्नरपासून आमराई , वखार भागातील महाराजा चौकापर्यंत रस्त्याकडेला उभ्या केलेल्या गाड्यांचा काचा त्याने फोडल्या. परिसरात शांतता असल्यामुळे काचा फुटल्याचा आवाज अचानक येऊ लागला.




म्हणून स्थानिकांनी बाहेर पाहिल्यावर ही घटन उघडकीस आली. यामध्ये हजारो रुपयांचे  नुकसान झाले आहे.