पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बाधंकाम व्यवसायिक डीएसकेंना तात्पुर्ता दिलासा मिळाला आहे, डीएसके यांच्या अंतरिम जामीनावर मंगळवारी दुपारी सुनावणी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सुनावणी अपूर्ण राहिल्याने, पुढील सुनावणी ही मंगळवारी ठेवण्यात आली आहे. पुण्याच्या सत्र न्यायालयात डी एस कुलकर्णी यांच्या जामीनावर निर्णय घेण्यात येणार आहे.


डीएसकेंच्या विरोधात ठेवीदारांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाकडे ठेवीदारांच्या तक्रारीचा ओघ सुरु आहे.  


शुक्रवारी साधारण दोनशे ठेवीदारांच्या तक्रारी या कक्षाकडे आल्या. आतापंर्यत साडे पाचशेच्यावर तक्रारी डीएसकेंच्या विरोधात आल्या आहेत. ठेवीदारांना तक्रार करण्यासाठी विशेष फॉर्म देखील छापण्यात आला आहे. 


डीएसकेंविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची तसेच त्यांच्या कंपन्यांची ७० बँक खाती गोठवण्यासाठीचा अर्ज पुणे पोलिसांनी इंडियन बँक असोसिएशनकडे केला आहे. 


त्याचप्रमाणे डीएसके यांनी विदेशातही गुंतवणुक केल्याची शक्यता गृहित धरुन त्याबाबत ईडी तसेच सेबीकडे पत्रव्वहार करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.