विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा विद्युत खांबावरच मृत्यू
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
पालघर : विद्युत खांबावर काम करताना विजेच्या धक्क्याने एका कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना पालघर येथे घडली. विजेचा धक्का बसल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचा मृतदेह जवळपास तासभर विद्युत खांबावरच लटकत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बोईसर पूर्व येथील बेटेगाव जवळील घटना
बोईसर पूर्व येथील बेटेगाव जवळील महेंद्र कॉप्लेक्समध्ये ही घटना घडली. विकास देवसिंग नावाचा कर्मचाऱ्याची महेंद्र कॉम्प्लेक्समध्ये विद्युत खांबावर काम करत होता. मात्र, त्याचवेळी विद्युत तारेमध्ये रिव्हर्स करंट आला आणि काही कळण्याच्या आत विजेचा धक्का लागल्याने देवसिंग यांचा तारेवरच मृत्यू झाला.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.