अरुण म्हात्रे, पुणे : शाळेची फी न भरल्याने दीड महिन्यांपासून दोन विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर उभे करण्यात येत आहे. योगीराज जमादार आणि पृथ्वीराज जमादार या दोन भावंडांना दीड महिना शिक्षणापासून शाळेने वंचित ठेवले आहे, हा सगळा प्रकार येथील एका टेक्निकल हायकूलमध्ये घडत आहे. आजही ही दोन मुले वर्गाच्या बाहेरच आहेत. त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर ठेवण्यात येत आहे. दीड महिना पुण्यातील बंगार्डन परिसरात जे न पेटिट टेक्निकल हायकुलमध्ये योगीराज जमादार आणि बालवाडीत असलेला पृथ्वीराज जमादार यांना फी भरली नाही म्हणून वर्गात बसून दिले जात नाही. दरम्यान, मुलांचे वडील अनेकवेळा शाळा प्रशासनाकडे फी भरतो पण थोडा वेळ द्या, लेट फी ही भरतो पण मुलांचे शैक्षणिक नुकसान करून नका, अशी विनंती केली. मात्र, शाळा प्रशासन आधी फी नंतर शिक्षण या भूमिकेत आहेत. त्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे. 


याबाबत शाळा व्यवस्थापन यांच्याशी संपर्क साधला असलात बोलण्यास नकार दिला. तसेच शाळा परिसरात जाण्यास मज्जाव केला. शिक्षण हक्क कायद्यानुसार फीसाठी मुलांना जबाबदार धरता येत नाही, त्याचे शैक्षणिक नुकसाही करता येत नाही. पण दीड महिन्यापासून ही दोन भावंड शिक्षणापासून लांब आहेत.