नाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय
शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरवात झालीय.
नाशिक : शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरवात झालीय.
गोदावरीच्या पुराचे पाणी ओसरु लागल्यामुळे पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा, घाण, पानवेली, गाळ, गोदाकाठावरच्या मंदिराभोवती जमा झालाय. तो हटविण्याचे काम युद्ध पातळीवर महापालिका प्रशासनाला करावे लागणार आहे.
दरम्यान शुक्रवारच्या पावसाने गंगापूर, दारणा, आळंदीसह इतर धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झालीय. दारणा धरणातून 5 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलंय तर नांदूर मध्यमेशवर धरणातून 22 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.