मुंबई : कोकणतल्या सावंतवाडी जवळच नेमळे-पाटकरवाडी येथे दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्पा झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघात प्रकरणी कोकण रेल्वेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी एका सेक्शन अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आलंय. 


अपघात झाला त्या आधी संबंधित ट्रॅकवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे समजते... त्याचा आणि या अपघाताचा काही संबंध आहे का? याची पडताळणीही केली जाणार आहे. 


सिनीअर अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ग्रेड दर्जाची चौकशी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मार्ग मोकळा करण्यासाठी घटनास्थळी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 


या गाडीला सिंधुदुर्गात थांबा नसतो. या गाडीचा वेगही जास्त असतो. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.