मुंबई : पॅरासेलिंग करताना मुंबईच्या पर्टकाचा मृत्यू झाल्याची घटना सिंधुदुर्गात दांडी समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. अझर मनझर अन्सारी (३२) असे त्यांचे नाव होते. ते आपल्या पत्नीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दांडी समुद्रकिनाऱ्यावर आले होते. बोटीवरून सेल्फी घेताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकंदरीतच पॅरासेलिंग करताना जिवाला अपाय होण्याच्या घटनांमध्ये लगतच्या काळात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अझर मनझर अन्सारी मुंबईमध्ये साकीनाका येथे वास्तव्यास होते. अन्सारी दाम्पत्य रविवारी दांडी येथील समुद्रकिनारी पर्यटनास गेले होते. 



अझर यांनी पॅरासिलिंगसाठी एका स्पीड बोटची निवड केली होती. पॅरासिलिंग दरम्यान चालकाने बोटीचा वेग  वाढवला. त्यामुळे सेल्फी काढत असलेल्या अझर यांचा तोल गेला आणि बोटीला आपटून ते खाली पडले. 


घडला प्रकार तेथील पर्यटन व्यावसायिकांच्या लक्षात येताच अझर यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण रूग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. 


त्यामुळे, कही क्षणांची मजा काही क्षणांचा थरार अनुभवण्यासाठी पॅरासिलिंगसारख्या खेळाचा वापर करण्यात येतो. समुद्रकिनारी गेल्यानंतर पर्यटकांकडून या थरार खेळांना प्राधान्य देण्यात येतं. म्हणून दोन क्षणांची ही मजा अशाप्रकारे आयुष्यावर बेतू शकते.