पंढरपूर: विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आषाढी यात्रा काळात २ कोटी ९० लाख ४४ हजार रूपयांचं उत्पन्न जमा झालंय. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २२ लाखांची वाढ झालीय. यावर्षीच्या यात्रा काळात ७ लाख भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतलं तर  ११ लाख भाविकांना मुखदर्शनाचा लाभ मिळाला. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिलीय.


कोट्यवधीची उड्डाणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, श्री विठ्ठलाच्या पायावर ३६ लाख ३७ हजार ५०९ रूपयांची देणगी मिळाली. श्री रूक्मिणी मातेच्या चरणी ६ लाख ९३ हजार ६२४  रूपयांची देणगी मिळाली... देणगी पावतीमधून १ कोटी ६० लाख १२ हजार ५५० रूपये, बुंदीलाडू प्रसाद विक्रीमधून ५ लाख ३८ हजार ४७० रूपये, राजगीरा लाडू प्रसाद विक्री मधून ५ लाख ६४ हजार ५०० रूपये, फोटो विक्रीतून ९५ हजार ४७५ रूपये अशा देणग्यांचा यामध्ये समावेश आहे.