कोरोना काळात लालपरीचे कर्मचारी मोठ्या अडचणीत
विना वेतन उदरनिर्वाह करायचा कसा हा प्रश्न सध्या एसटी कर्मचाऱ्यांना पडला
मुंबई : राज्यातील प्रवासी जीवनवाहिनी असलेल्या लाल परीचे कर्मचारी सध्या मोठ्या अडचणींत आहेत. कोरोना काळात लालपरीला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. एसटी कर्मचाऱ्यांना पगाराविना भागवावे लागत आहे. घरखर्च- घरभाडे- लाईट बिल- किराणा सामान- पाल्यांचे शिक्षण आदी खर्च जारी आहेत. याशिवाय इतर साधनांसाठी लागणारा पैसा आता त्यांच्याकडे उरलेला नाही. उधार उसनवारी-कर्ज काढून देखील गाडा पुढे हाकताना कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत.
विना वेतन उदरनिर्वाह करायचा कसा हा प्रश्न सध्या एसटी कर्मचाऱ्यांना पडला आहे. प्रवासी कमी असल्यामुळे फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे काहींना ड्युटी मिळतेय तर काही घरी बसून आहेत. पगार झाले नाही ही तर पुढचा काळ अधिक कठीण होणार आहे. आता एस. टी. पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्णय घेण्यात आलाय मात्र गावोगावी कोरोना उद्रेक झाल्याने एस. टी. प्रवासाला फारसा प्रतिसाद नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारने गंभीर दखल घेऊन पगाराचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
एसटीच्या अस्तित्वासाठी इंटकचे राज्यव्यापी अभियान पुकारण्यात आलं आहे.. १७ ते २४ सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व आमदार, खासदारांना निवेदन देण्यात येणार आहे. एसटी बचाव कामगार बचाव अभियान २ पुकारण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे एसटीला १५३ दिवसांत तब्बल ३३६६ कोटींचं आर्थिक नुकसान झालं आहे. IFrame आज गोरगरीबांची जीवनवाहनी आर्थिक संकटात सापडली आहे.
राज्यातील विविध महामंडळांना सरकार मदत करत आहे. पण उत्पादन किंवा कोणताही आर्थिक फायदा नसलेल्या महामंडळातील कर्मचा-यांना मात्र शासन आर्थिक लाभ देत असल्याचा आरोप मुकेश तिगोटे यांनी केला.
आज गोरगरीबांची जीवनवाहनी आर्थिक संकटात सापडली आहे. राज्यातील विविध महामंडळांना सरकार मदत करत आहे. पण उत्पादन किंवा कोणताही आर्थिक फायदा नसलेल्या महामंडळातील कर्मचा-यांना मात्र शासन आर्थिक लाभ देत असल्याचा आरोप मुकेश तिगोटे यांनी केला.