मुंबई : दोन दसरा मेळावे सुरू असून उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे हे बीकेसीवर शिंदे गटाच्या व्यासपीठावर दिसले. ठाकरे कुटूंबातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे शिंदे गटात सामील झाल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवण्यात आली होती त्याच बाजूला जयदेव ठाकरे यांना स्थान देण्यात आलं आहे. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आलाय.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा ठाकरे कुणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. हा 'एकनाथ'ला 'एकटा'नाथ होऊ देऊ नका हा एकनाथच राहूद्या. तुम्हा सर्वांना विनंती आहे की एकनाथराव गोरगरिबांचं काम करत आहे. एकनाथरांवांनी दोन ते तीन भूमिका घेतल्या ज्या मला खूप आवडल्या, असा धडाडीचा माणूस आपल्याला हवा असल्याचं जयदेव ठाकरे म्हणाले.