पालघर पुन्हा हादरलं, गेल्या ३ महिन्यांपासून भूकंपाची मालिका सुरुच
पालघरमध्ये भीतीचं वातावरण
पालघर : आज सकाळी पुन्हा एकदा पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ३.१ रिश्टर स्केलचा हा भूंकप असल्याचं समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या ३ महिन्यांपासून पालघरमध्ये भूकंपाची मालिका सुरू आहे. सतत भूकंपाच्या दहशतीत राहणाऱ्या अनेक ग्रामस्थांनी घरे सोडली आहेत. तर अनेकांनी भूकंप कधीही होईल या भीतीने घराबाहेर मंडपात संसार मांडला आहे.
गेल्या आठवड्यात डहाणू, तलासरीत सलग चार भूकंपाचे हादरे बसले होते. यात एका २ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. प्रशासनाकडून परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे. भूकंपाच्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी भूकंपग्रस्त नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सतत होणाऱ्या भूकंपाची प्रशासनाने दखल घेतली असून परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे.