प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Express Highway) भीषण अपघात झाला आहे. इको आणि एसटी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र इको कारमधील गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर उपचार सुरु आहेत. (echo van and st bus accident at mahad kemburli on mumbai goa express highway 5 injured)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतून कोकणात 'मुंबई-उटबर' निघाली होती. या एसटी बसला केंबुर्ली गावाच्या हद्दीत समोरून येणाऱ्या इकोने हॉटेल सिद्धेश जवळ धडक दिली. अपघातात इको कारच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. तर एसटीच्याही समोरच्या भागाचं नुकसान झालंय.
 
अपघातात इकोमधील 5 जणांना गंभीर दुखापत झाल्याचं समजतंय. या जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित जखमी हे रत्नागिरी जिल्ह्यातील असून यामध्ये गुणाजी रत्नू लिगम , आराध्य सचिन लिगम , अथर्व सचिन लिगम , सचिन निकम व सानिका सचिन निकम यांचा समावेश असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. तसेच या एसटीत चालक प्रवीण शिरसम आणि वाहक बाबासाहेब खाडे हे असल्याची माहिती महाड एसटी आगारातून देण्यात आली आहे.