जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या पहिल्या १२५ उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासारख्या दिग्गजांची नावे आलेली नाहीत. भाजपाच्या पहिल्या यादीत नाव नसलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे. येत्या काही दिवसात उमेदवारीबाबत काय निर्णय होतो ते पाहू. मात्र तुम्ही साथ द्याल का? असा भावनिक सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. उभं आयुष्य पक्षासाठी खर्च करणं गुन्हा असेल, तर तो गुन्हा आपण केल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. पण तरीही मुहूर्त होता म्हणून खडसेंनी फॉर्म भरुन टाकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे खडसेंचं पहिल्या यादीत नाव न आल्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. झी २४ तासशी बोलताना त्यांनी अशी वेळ कुणावरही येऊ नये, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.


इथे पाहा भाजपाची १२५ नावांची संपूर्ण यादी


भाजपच्या १२५ जणांच्या यादीत ५२ आमदारांना पुन्हा एकदा संधी दिलेलं या यादीतून आढळून येतंय. तर १२ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं गेलं आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, राज पुरोहीत आणि प्रकाश मेहता या चर्चित नावांचा मात्र भाजपाच्या पहिल्या यादीत समावेश नाही.


भाजपने पुणे कॅन्टोनमेंटमधून दिलीप कांबळे यांचं तिकीट कापलं आहे, त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनिल कांबळे यांना तिकीट देण्यात आलं आहे. पुण्यातील शिवाजीनरमधून विजय काळे, मुलुंडमधून सरदार तारासिंग, बीड जिल्ह्यातील माजलगावमधून ए टी देशमुख, दक्षिण नागपूरमधून आमदार सुधाकर कोहळे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.