मुंबई : दादरमध्ये शिंदे आणि ठाकरे गट (Shinde and thackeray group) आमने सामने आल्याची घटना घडलीय. दादर पोलिस स्टेशनबाहेर हे दोन्ही गट एकमेंकांमध्ये भिडले आहेत. गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या राड्यामुळे हे दोन्ही गट आमने सामने आल्याची माहीती आहे.  या राड्याच्या घटनेमुळे परीसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. पोलिस या राड्यावर नियंत्रणात मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या दिवशी शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. याच मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात (Shinde and thackeray group) शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी दादर येथील शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांनी शिंदे गटाचे प्रभादेवी येथील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना रात्री 12.30 मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीनंतर दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्याप्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटाच्या 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल केला होता. 


दरम्यान विसर्जन मिरवणूकी दरम्यान झालेल्या राड्यानंतर आज सकाळी पुन्हा दादर पोलीस स्टेशनबाहेर शिंदे आणि ठाकरे गट (Shinde and thackeray group)  आमने सामने आले आहेत. यावेळी देखील शिंदे आणि ठाकरे गटात तुफान राडा झाला होता. यावेळी खासदार अरविंद सावंत या राड्यावर कार्यकर्त्यांशी बातचीत करत होते. या राड्यामुळे परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस या राड्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत.