ठाणे : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र ठाण्यातले रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. मनपाने आता हे खड्डे बुजवण्यासाठी कंबर कसली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रात्री सुरू असलेल्या कामाची स्वतः पाहणी केली. रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ५ वाजेपर्यंत ठिकठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शहरामध्ये वाहतूककोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पालकमंत्री स्वतः केवळ ठाण्यातले खड्डे बुजवण्याची पाहणी करणार की ठाणे जिल्ह्यातली इतर शहरंही खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असा प्रश्न विचारला जात आहे. 



खड्डे बुजविण्यासाठी सुरू असलेल्या बॅरिगेटिंगमुळे शहरात चांगलीच कोंडी देखील झाली होती. ठाणे रेल्वे स्थानक परिसराकडे जाणाऱ्या स्टेशन रोडवरून मोठ्या प्रमाणात बसगाड्या आणि टीएमटीची वाहतूक होत असून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते.