Ajit Pawar Exclusive Interview : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खास पार पडली. या मुलखतीत अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांची अजित पवार रोखठोक उत्तर दिली. आवडता मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न अवधूत गुप्ते यांनी विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार यांनी चांगलीच गुगली टाकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण असा प्रश्न अवधूत गुप्ते यांनी अजित पवार यांना विचारला.  आवडते मुख्यमंत्री हा अडचणीचा प्रश्न तुम्ही विचरला असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत या प्रश्नाचे उत्तर दिले. 


एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह चांगले संबध आहेत. यामुळे प्रश्नाचे उत्तर देण अडचणीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी काम केलेले आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्यासह मी सध्या काम करत आहे. दोघेही चांगले काम करत आहेत. यामुळे आवडता मुख्यमंत्री कोण याचे उत्तर देताना कोणा एकाचे नाव घेतलं तर दुसरे नाराज होतील असं म्हणत अजित पवार यांनी अवधूत गुप्ते यांच्या प्रश्नवर गुगली टाकली.   


रिमोट कंट्रोल माझ्याच हातात पाहिजे - अजित पवार


‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एक खेळ खेळला जातो. यात काही वस्तू दिल्या जातात. या वस्तु कुणाला देणार असा प्रश्न विचारला जातो. यावेळी अजित पवार यांना रिमोटच कंट्रोल, बर्फ, भोंगा आणि तिळगूळ या वस्तू देण्यात आल्या. अजित पवार यांनी कोणचेही नाव घेता अगदी सावध पद्धतीने याची उत्तर दिले. बर्फ हा पार्थ पवार यांना दिला पाहिजे. भोंगा सकाळी 9 वाजता येणाऱ्याला द्यावा असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तर,   तिळगूळ  ठाण्याला पाठवा असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे  जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट केले.  रिमोटच कंट्रोल मी कुणालाही देणार नाही. रिमोटच कंट्रोल मी माझ्याकडेच ठेवेण असं म्हणत त्यांनी शरद पवार गटाला इशारा दिला. 


माझ्या सोबत रहायचं असेल तर माफी मागावीच लागेल 


रॅपिड फायर राऊंडमध्ये अजित पवार यांना त्यांच्या पत्नीबाबत प्रश्न विचारण्यात आला. पत्नीसह भांडण झाल्यावर पहिल्यांदा माफी कोण मागतं? असा प्रश्न अवधूत गुप्ते यांनी अजित पवार यांना विचारला. माझ्या सोबत रहायचं असेल तर त्यांना माफी मागावीच लागेल असं अजित पवार म्हणाले. पुरणपोळी की जिलेबी फाफडा? आवडता पदार्थ कोणता? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला.  पुरणपोळीला तोड नाही. पण, कधीतरी चेंज म्हणून जिलेबी फाफडा ठीक आहे असं उत्तर अजित पवार यांनी दिले.