Eknath Shinde Attack On Uddhav Thackeray convoy: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील मेळाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला होता. मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ आणि शेण फेकलं. याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहे. या राड्यानंतर राज्यात नवा वाद उफाळून आला आहे. मनसे विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळतोय. या सगळ्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातील हल्ला म्हणजे अॅक्शनला रिअॅक्शन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हचलं आहे. 'ही आपली संस्कृती नाही ही आपली परंपरा नाहीये. खरे सुरुवात आहे ही राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली त्यांनी त्या ठिकाणी राज ठाकरेंचा ताफा अडवला. शेवटी अॅक्शनला रिअॅक्शन असते. आज येथे या ठिकाणी पाहायला मिळालं. मात्र असे आंदोलन कोणालाच अपेक्षित नव्हते. या हल्ल्याला माझे समर्थन नाहीच,' असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 


'सरकार स्थापन झाल्यास सुद्धा त्याच्या नंतर बोलतात की हे सरकार घटना पाहिजे आहे सरकार पडणार. परंतु असं झालं नाही सरकार अधिकार अधिक मजबूत होत गेलं आणि आम्ही बाळासाहेब यांचे विचार सोडले नाही. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा प्रकारच्या सामना करावा लागतो,' असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 


'सत्तेसाठी आम्ही विचारांशी कोणतंही  कॉम्प्रमाईज करणार नाही. धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे हे लोक आम्हाला दिल्लीतलं काय सांगता येत दिल्लीतली लोक आधी मातोश्री मध्ये यायचे आणि हे लोक आता मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण घालत आहेत. आम्ही दिल्लीला जातो ते राज्यातील विकासासाठी जातो आणि आम्ही कुठल्याही लपून-छपून काम करत नाही आणि मुख्यमंत्रीपद मिळावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात नाही. आता अनेक लोक बोलत फिरत आहेत. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा पण आम्ही तसं कधीच केलं नाही, मुख्यमंत्रीपदासाठी कधीही विचारांची गद्दारी केली नाही,' अशी टीकादेखील एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 


'ते माझ्या दाढीवरुन बोलले, माझ्या दाढीची धास्ती आहे त्यांना. या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली ना. मिमिक्री करणं आता हेच काम उरलेला आहे. बाळासाहेब असताना जर त्यांनी असा प्रकारचं काम केलं असतं तर बाळासाहेबांनी त्यांना जंगलात फोटोग्राफी करण्यासाठी पाठवलं असतं,' असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.