Eknath Shinde Dasara Melava : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या (Maratha reservation) आरक्षणाचा विषय पेटला आहे. मनोज जरांगे (Manoj jarange) यांनी सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यामुळे आता सरकारकडे फक्त काही तास शिल्लक आहे. अशातच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली अन् मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं आहे.


काय म्हणाले Eknath Shinde ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी देखील सर्वसामान्य मराठा कुटूंबातील आहे. जस्टीस शिंदे यांची समिती दिवसरात्र काम करत आहे. कोणावरही अनन्य न करता मराठा समाजाला आरक्षण देणार, असं आश्वास एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन शपथ घेतली. मराठा समाजासाठी आपलं सरकार आहे. मी आपल्याला विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. मुलाबाळांचा विचार करा. आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही? हे तुम्हालाही माहित आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्दध आहे. राज्यात अशांतता पसरवण्याचं काम काही लोकं करत आहे, असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. 


एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार.  मला गोरगरिब जनतेपेक्षा हे मुख्यमंत्री पदमहत्त्वाचं नाही. म्हणून राज्यातील प्रत्येक समाज घटकाला आपल्याला पुढे न्यायचं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आसूड ओढले. 



एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार.  मला गोरगरिब जनतेपेक्षा हे मुख्यमंत्री पदमहत्त्वाचं नाही. म्हणून राज्यातील प्रत्येक समाज घटकाला आपल्याला पुढे न्यायचं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मी मुंख्यमंत्री झालो तरीही मी माझ्यातला कार्यकर्ता मरू दिला नाही. सोन्याचा चमचा घेणाऱ्यांनीच मुख्यमंत्री होणार, असं काही लिहिलं आहे का? मुख्यमंत्री बदलणार असं तुम्ही म्हणता. पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.